Pages

Monday, 14 May 2018

रस्ते खोदाईचे गौडबंगाल

पिंपरी-चिंचवड वर्तमान – सूरज व्यास
शहरातील प्रत्येक काना-कोपऱ्यात सध्या रस्ते खोदाई सुरु आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने शहराच्या प्रत्येक रस्ता खोदण्यात आला आहे. रस्ते खोदाईसाठी दिलेली परवानगी आणि प्रत्यक्षात करण्यात आलेले खोदकाम यात बरीच तफावत आढळते. हीच तफावत भ्रष्टाचाराला पोसत असते. याबाबत दैनिक”प्रभात’ने विस्तृत वृत्त प्रकाशित केल्यानंतर यावर चर्चा सुरु झाली आणि सत्ताधाऱ्यांना स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले. परंतु जोपर्यंत या प्रणालीत पारदर्शकतेचा अभाव असेल तोपर्यंत भ्रष्टाचाराला वाव हा राहणारच.

No comments:

Post a Comment