Pages

Monday, 30 July 2018

सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे

नागरी हक्क सुरक्षा समितीची मागणी
पिंपरी- पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पालिकेच्यावतीने सद्यस्थितीत एकही हॉल अथवा नाट्यगृह उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेच्यावतीने हॉल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्यावतीने मानव कांबळे, दिलीप काकडे, प्रदीप पवार, उमेश इनामदार, गिरिधारी लढ्ढा, प्रताप लोके, अशोक मोहिते आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.

No comments:

Post a Comment