Pages

Saturday, 7 July 2018

झाडांच्या मुळावर उठला रस्ता

सांगवी – विकासाच्या नावाखाली पुन्हा एकदा कित्येक जुन्या झाडांचा बळी घेण्याचे काम सुरू आहे. कित्येक वर्षांपासून नागरिकांना सावली आणि प्राणवायू देणाऱ्या पिंपळे गुरव येथील मुक्‍या झाडांना मुळापासून उपटून टाकण्यात येत आहे. आधी या झाडांच्या फांद्या छाटून केवळ खोड ठेवण्यात आले आणि नंतर जेसीबी लावून मुळापासून ही झाडे उपटण्यात आली. पिंपळे गुरव येथील तुळजा भवानी मंदिर ते बीआरटी रोड दरम्यानच्या तब्बल 31 झाडांवर कुऱ्हाड कोसळत आहे. पदपथावरील बहुतेक सर्व झाडे काढली जात असल्याचे पाहून नागरिकांनी रोष व्यक्‍त केला आहे.

No comments:

Post a Comment