Pages

Saturday, 14 July 2018

वाहतूक विभागाचे कार्यालय की खुराडे?

पिंपरी – दिवसभर तपास, बंदोबस्त, पोलीस ठाण्याचे काम, न्यायालयाचे काम सगळीकडेच फिरस्तीवर रहावे लागते. कुठे निवांत क्षण मिळणे कठीणच आणि तशी व्यवस्थाही वाहतूक पोलिसांना नाही. वाहतूक विभागाचे पिंपरी कार्यालयच छोट्याशा गाळ्यांमध्ये असल्याने जागेअभावी कर्मचाऱ्यांना उठ-बस देखील करता येत नाही. याठिकाणी कोणत्याच सुविधा नसल्याने त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे वाहतूक विभागाचे कार्यालय आहे की खुराडे? असा सवाल, पोलीस कर्मचाऱ्यांसह याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही पडतो.

No comments:

Post a Comment