Pages

Sunday, 8 July 2018

पाऊस चोख बजावतोय पालिकेची जबाबदारी

वाकड – मुळशी आणि मावळच्या ग्रामीण भागात तीन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे थेरगाव मधील केजुदेवी बंधारा तुडूंब भरून वाहत आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाह गेल्या कित्येक महिन्यांपासून नदीचा पिच्छा पुरवणाऱ्या जलपर्णीला धुवून नेत आहे. जलपर्णी काढण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेची जबाबदारी पाऊस सध्या चोख बजावताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment