Pages

Monday, 16 July 2018

पदाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये नाराजी

अतिकालिक भत्त्यांवर येणार संकट
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसचिव कार्यालयांतर्गत येणार्‍या पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक, शिपाई यांच्या कामकाज वेळात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा अतिकालिक भत्त्यांवर संकट येणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या तिसर्‍या मजल्यावर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, विविध पक्षांचे गटनेते यांची कार्यालये आहेत. तिसर्‍या मजल्यावर एकूण स्वीय सहाय्यक आणि शिपाई असे 51 कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांना 1800 रुपये भत्ता दिला जातो. परंतु, प्रशासनाने अतिकालिक भत्त्यामध्ये बचत करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या कामकाजाचा वेळा बदलण्यात येणार आहेत. त्यानुसार एका कर्मचार्‍याला सकाळी दहा ते पावणेसहा अशी जनरल शिफ्ट तर दुसर्‍या कर्मचार्‍याला दुपारी 12 ते रात्री पावणेआठ असे करण्याचे नियोजन आहे.

No comments:

Post a Comment