Pages

Monday, 20 August 2018

पिंपरी- वाहतूक नियम धाब्यावर

पिंपरी-चिंचवडमधील चौका-चौकांत दुचाकीस्वार तसेच तीनआसनी रिक्षाचालक वाहतूक नियम तोडत असतात. खराळवाडीतून पिंपरी चौकात दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येतात. इंदिरा गांधी उड्डाण पुलावर एकेरी वाहतूक असतानाही दुचाकीस्वार नियम तोडतात. चिंचवड स्टेशन चौकातही दुचाकी स्वार मनमानी करतात. नागरिकांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागते. पिंपरीतील डाल्को कॉर्नरवरून एच. ए. भुयारी मार्गाकडे विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार जातात. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.  (अरुण गायकवाड : सकाळ छायाचित्रसेवा)

No comments:

Post a Comment