Pages

Saturday, 18 August 2018

जोड वृक्ष वेगळे करून पुन:रोपण सफल

पिंपरी – सध्या शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. मेट्रोच्या मार्गिकेत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांना छाटण्याऐवजी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने वृक्षांचे पुन: रोपण केले आहे. हे काम किती जरी क्‍लिष्ट असले तरी झाडे कापण्याऐवजी त्यांना मूळासकट काढून मेट्रो दुसऱ्या ठिकाणी लावत आहे. प्रत्यारोपणाच्या या कार्यात दोन झाडांसाठी मेट्रोच्या हॉर्टीकल्चर विभागास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. एकमेकांमध्ये गुंफलेल्या दोन झाडांना वेगळे करून मेट्रोने त्यांना पुन: रोपण केले.

No comments:

Post a Comment