Pages

Wednesday, 29 August 2018

आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांची वायसीएम रुग्णालयास भेट

चौफेर न्यूज – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी मंगळवारी दुपारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयास भेट दिली. शहरामध्ये स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आल्याने रूग्णालयाकडून घेण्यात येणाऱ्या स्वाईन फ्लू प्रतीबंधात्मक उपाय योजनांचा आढावा घेतला. या अनुषंगाने स्वाईन फ्लू बाबत स्टँडर्ड प्रोटोकॉलचे पालन होते किंवा कसे याचीही माहीती घेतली. तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भेट दिली. पदव्यूत्तर संस्था स्थापन करण्याच्या तयारी बाबत आढावा घेतला.

No comments:

Post a Comment