Pages

Saturday, 25 August 2018

विनापरवाना जाहिराती ; रॉयल अ‍ॅकॅडमीवर गुन्हा

पिंपरी : महापालिकेची परवानगी न घेता महापालिकेच्या हद्दीत जाहिरातीचे फलक लावले. यावरून रॉयल अकॅडमी पिंपरी-चिंचवडचे संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक शशिकांत शिवाजी मोरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रॉयल अकॅडमीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी येथील महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखालील खांबावर जाहिरातीचे स्टिकर चिकटवले होते.

No comments:

Post a Comment