Pages

Saturday, 29 September 2018

पुणे- लोणावळा लोकलच्या चार फेऱ्या रद्द

पुणे  - पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोहमार्ग देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार (ता. 1) ते 17 ऑक्‍टोबरपर्यंत दररोज तीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या काळात पुण्याहून लोणावळ्याला जाण्यासाठी दुपारी सव्वाबारा आणि एक वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच लोणावळ्याहून पुण्याला येण्यासाठी दुपारी दोन आणि तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

No comments:

Post a Comment