Pages

Sunday, 2 September 2018

इंदलकर यांच्याकडे ‘कायदा’, तर झगडे यांच्याकडे ‘एलबीटी’

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील रिक्त झालेल्या कायदा सल्लागार व अतिरिक्त कायदा सल्लागार या पदांचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, स्मिता झगडे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाचा अतिरिक्त पदभार दिला.  महापालिकेत आस्थापनेवर कायदा सल्लागार आणि अतिरिक्त कायदा सल्लागार हे दोन्ही पदे मंजूर आहेत. पालिकेचे कायदा अधिकारी अ‍ॅड. सर्जेराव लावंड या पूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त कायदा सल्लागार असलेल्या अ‍ॅड. सतिश पवार यांच्याकडे कायदा सल्लागार पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.

No comments:

Post a Comment