Pages

Wednesday, 26 September 2018

माजी महापौरांचा होणार सत्कार

पिंपरी– महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत शहराचे प्रथम नागरिक हे महापौरपद भुषविणाऱ्या सर्व माजी महापौरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि.26) दुपारी एक वाजता हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात होणार आहे, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी दिली. माजी महापौरांच्या अनुभवाचा शहर विकासात हातभार लागावा, त्यांचे मार्गदर्शन लाभावे, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत माजी महापौरांशी संवाद साधून, त्यांच्याकडून विविध सुचना व अपेक्षित बदलांविषयी चर्चा केली जाणार आहे. तसेच या सर्वांचा महापालिकेच्या वतीने पुस्तक भेट देऊन सत्कार केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment