Pages

Thursday, 27 September 2018

स्केटिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या; आमदार महेश लांडगे यांचे अधिका-यांना निर्देश

अधिका-यांसमवेत कामाची केली पाहणी
निर्भीडसत्ता न्यूज  –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणा-या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे.  खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. 

No comments:

Post a Comment