Pages

Monday, 15 October 2018

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीसाठी 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे. याकरिता कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भार महापालिका तिजोरीवर पडणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल, याची तजवीज करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी लेखा विभागाला दिले आहेत.

No comments:

Post a Comment