Pages

Monday, 8 October 2018

राष्ट्रवादीकडून मावळसाठी वाघेरे, भोईर इच्छूक

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी याठिकाणाहून लढण्याची इच्छा पक्षाच्या मुंबईतील आढावा बैठकीत व्यक्त केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेत, मावळातून राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment