Pages

Monday, 8 October 2018

पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीच्या कामाला गती द्या

सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिल्या सूचना
चिंचवड : पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाला वेग देण्यात यावा. कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. आगामी महिन्यभरात फर्निचरसह स्थापत्य विषयक कामे मार्गी लावण्यात यावीत, अशा सूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिकार्‍यांना दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरासाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. तात्पुरत्या स्वरुपात चिंचवड येथील अ‍ॅटो क्लस्टर मधून आयुक्तालयाचे कामकाज सुरु आहे. पोलीस आयुक्तालय चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये कायमस्वरुपी होणार आहे. इमारतीमध्ये कामकाज सुरु असून सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शनिवारी (दि. 6) कामाची पाहणी केली.

No comments:

Post a Comment