Pages

Tuesday, 2 October 2018

पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या ‘अपयशी’ कारभाराचा अजितदादांनी वाचला पाढा!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड गलिंच्छ शहर झाले आहे. मेट्रोचं काम निगडीपर्यंत नेता आले नाही. चऱ्होलीतील पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला हरताळ फासली गेलीय. कचऱ्याचा प्रश्न बिकट झालायं. स्मार्टसिटीच्या कामाला दिशा नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर झालायं, वायसीएम रूग्णालय दुर्लक्षित आहे. महापालिकेत भोंगळ कारभार सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐंरणीवर असून शहराला कोणी वालीच उरला नसल्याचे सांगत दिड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाच्या ‘अपयशी’ कारभाराचा पाढाच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविला.

No comments:

Post a Comment