Pages

Saturday, 13 October 2018

चिंचवडगावात अयोध्या श्रीराम मंदिर प्रतिकृती

चिंचवड नवरात्र महोत्सवातर्फे 18 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम
‘श्रीराम नाम जप’ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत संकल्पना
पिंपरी-चिंचवड : चिंचवड नवरात्र उत्सवानिमित्त भक्तीमय वातावरणात देवीची, तसेच श्रीराम मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. राजेंद्र पवार, स्वाती पवार यांच्या हस्ते कार्यक्रम झाला. मकरंद बेलसरे यांनी पौराहित्य केले. चिंचवड नवरात्र महोत्सवातर्फे 18 ऑक्टोबरपर्यंत महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, नियोजित अयोध्या श्रीराम मंदिराच्या साकारलेल्या हुबेहुब प्रतिकृतीचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर संकल्प पूर्तीसाठी ‘श्री राम नाम जप’ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत अशी संकल्पना केली आहे. त्याला नागरिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतिकृती पाहण्यास उत्स्फूर्त गर्दी केली.

No comments:

Post a Comment