Pages

Wednesday, 31 October 2018

स्थायी समितीत आयुक्‍तच “फैलावर’

पिंपरी- भोसरी-इंद्रायणीनगरमधील बॅडमिंटन हॉलच्या विकासकामाचा विषय मार्गी लावण्यासाठी धोरण ठरवावे लागेल, असे उत्तर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेत दिले. स्थायीचा निर्णय झालेला असतानाही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे फक्‍त भोसरीतील विकासकामांनाच धोरण ठरवावे लागत आहे, असे का? असा प्रश्‍न स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्‍त मात्र निरुत्तर झाले होते.

No comments:

Post a Comment