Pages

Wednesday, 17 October 2018

‘पीएफ’वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची ‘दिन दिन दिवाळी’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ शी संबंधीत एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य सुकर आणि सुखावह करणाऱ्या जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि अन्य बचत योजनांवरील व्याजाचा दर ८ टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय वित्त विभागानं या संदर्भातील परिपत्रक काढलं. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कर्मचाऱ्यांना जीपीएफवर ८ टक्क्याने व्याज मिळेल. हा दर गेल्या सहा महिन्यांपासून ७.६ टक्के होता.

No comments:

Post a Comment