Pages

Monday, 8 October 2018

बीआरटीतील घुसखोरी रोखणाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

पिंपरी – दापोडी ते निगडी दरम्यान दोन महिन्यापूर्वी बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला. मात्र, या मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी 90 माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आलेले आहे. देशाची सेवा करुन आलेले जवान बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा शिरकाव होऊ न देण्याची कामगिरी चोख पद्धतीने बजावत आहेत. मात्र, या जवानांची सुविधेअभावी गैरसोय होत आहे. बीआरटी मार्गात जवानांना बसायला खुर्ची नाही, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी छत नाही, वाहने आडवण्यासाठी हातात तुटलेली दोरी या अवस्थेत जवानांना सेवा बजवावी लागत आहेत.

No comments:

Post a Comment