Pages

Friday, 5 October 2018

खुशखबर ! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त करण्यात आलं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता ५ रुपयांनी स्वस्त झालं आहे. उद्यापासून नवे दर लागू होतील अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून इंधनाचे दर कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

No comments:

Post a Comment