Pages

Thursday, 11 October 2018

कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात दुप्पट वाढ

पिंपरी - महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कुशल, अर्धकुशल, अकुशल व शिकाऊ कामगारांसह सफाई कामगारांच्या मूळ वेतनात जवळपास दुपटीने वाढ केली आहे. दसरा व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर वेतनवाढ झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मूळ वेतन आणि विशेष भत्ता मिळून त्यांना एक जुलैपासून ३१ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी किमान वेतन दिले जाणार आहे. याबाबत कामगार कल्याण विभागाने महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना कळविले आहे. 

No comments:

Post a Comment