Pages

Tuesday, 2 October 2018

पटसंख्येत महापालिका “फर्स्ट क्‍लास’

पिंपरी – “स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा “हायटेक’ होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर दिसू लागला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यामुळे, महापालिका शाळांची गुणवत्ता वाढत असल्याने मागील वर्षीपेक्षा यंदा महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या अकराशेने वाढली आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वाढता कौल पाहता या शाळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.

No comments:

Post a Comment