Pages

Tuesday, 20 November 2018

6 लाख 18 हजार बालकांना रुबेला लस

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 6 लाख 18 हजार बालकांना रुबेला व मिझेल्स लस दिली जाणार आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून पुढील पाच आठवडे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या वैद्यकीय विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल के. रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment