Pages

Thursday, 22 November 2018

शहरातील नद्यांना समृद्ध करण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने ‘मुठाई महोत्सव’

पिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून आणि परिसरातून वाहणा-या नद्या मरणासन्न झाल्या आहेत. त्यांना पुन्हा उर्जितावस्था मिळावी. पुन्हा नद्यांचे वैभव खुलावे यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील १९ नदीप्रेमी संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्था नद्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढून त्यांना पुन्हा समृद्ध करण्यासाठी भारतीय नदी दिवसानिमित्त ‘मुठाई महोत्सव’ साजरा करणार असल्याची माहिती शैलजा देशपांडे, प्रदीप वाल्हेकर, नरेंद्र चुघ, राजीव भावसार, सचिन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment