Pages

Friday, 23 November 2018

आता आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्याचा चीन दौरा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर हे चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीन येथे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर होणा-या कार्यशाळेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यासाठी येणाऱ्या 75 हजार रुपयांचा खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे परदेश दौरे सुरुच आहेत. नुकतेच स्मार्ट सिटीचे संचालक असलेले पदाधिकारी आणि अधिकारी बार्सिलोनाचा दौरा करुन आले आहेत. या दौऱ्यावर टीका होत असतानाच आता आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर चीन दौऱ्यावर जाणार आहेत.

No comments:

Post a Comment