Pages

Friday, 2 November 2018

सफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

पिंपरी- दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात नाही. यंदा ठेकेदारांकडून त्यांना बोनस द्यावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. प्रल्हाद कांबळे, मंगल जाधव, वंदना साळवे, सविता लोंढे, मंगल कसबे, अनिता ससाणे, प्रविण महाडिक, माया कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदनात नमूद केले आहे की, दैनंदिन साफसफाई करणारे दीड हजार कामगार कार्यरत आहेत. 

No comments:

Post a Comment