Pages

Thursday, 1 November 2018

पिंपरी ते निगडी डीपीआरचे दिवाळीनंतर सादरीकरण

– आयुक्त श्रावण हर्डिकरांची स्थायी समिती बैठकीत माहिती

चौफेर न्यूज – पिंपरी महापालिकेपासून निगडीच्या भक्ती-शक्ती चैाकापर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. त्याचे दिवाळीनंतर महापालिकेच्या सभागृहात सादरीकरण करण्यात येईल. तसेच या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी याठिकाणी मेट्रो स्थानके असणार आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी स्थायी समितीच्या आज ( मंगळवारी) झालेल्या बैठकीत सांगितले.

No comments:

Post a Comment