Pages

Tuesday, 4 December 2018

“ज्ञानोबा-माऊली’, “पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली

आळंदी – “अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपूत्र’ या भावनेने माउलींचे आशीर्वाद घेण्यासाठी वैष्णवांची मांदियाळी सोमवारी आळंदीत अवतरली. निमित्त होते कार्तिकी एकादशीचे. सहभागी भाविकांनी ज्ञान, प्रेम अन्‌ भक्‍तीचा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवत माऊलींवरील निस्सीम श्रद्धेचा जणू प्रत्ययच दिला. “ज्ञानोबा-माऊली…’ असा जयघोष, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’चा नामगजर, टाळ, मृदंग, वीणेचा त्रिनाद आणि हरिनामाचा जयघोष करीत लाखो भाविकांनी कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले.

No comments:

Post a Comment