Pages

Friday, 14 December 2018

बहुचर्चित डिजीटल घड्याळाचा प्रस्ताव फेटाळला

पिंपरी- शहर स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने 7 कोटी खर्चुन सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी 4 हजार 544 स्मार्ट वॉच थेट पद्धतीने भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला. मोघम प्रस्ताव सादर न करता त्याची सविस्तर माहिती सभागृहासमोर सादर करा. त्यानंतर बघू, अशी स्थायी समिती सदस्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासनाला या प्रस्तावाची सविस्तर माहिती दिल्यानंतरच या प्रस्तावाचा विचार केला जाणार आहे. ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

No comments:

Post a Comment