Pages

Wednesday, 26 December 2018

आता आयुक्‍तांची “सटकली’

पिंपरी – अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार टीकेचा सामना करावा लागणाऱ्या महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आपला दांडपट्टा फिरवायला सुरूवात केली आहे. कर्तव्यात सचोटी न राखल्याबद्दल सहाय्यक आयुक्‍त आण्णा बोदडे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे यांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment