Pages

Friday, 14 December 2018

महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे शनिवारी उद्घाटन

चौफेर न्यूज –  वायसीएम रुग्णालयातील रुग्णांना मोफत भोजन देणाऱ्या महाराजा आग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड येथे  शनिवारी उद्घाटन होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल यांनी दिली.
शनिवारी दि.१५ रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड स्टेशन येथील अग्रसेन भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे, मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment