Pages

Saturday, 1 December 2018

बांधकामाच्या ‘ध्वनी’ प्रदुषणाने नागरिक त्रस्त, नगरसेविका मिनल यादव यांचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तीन वेळा तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी केला आहे. तसेच रात्रीच्या वेळी चालणारे बांधकामाचे काम त्वरित थांबवावे, अन्य तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment