Pages

Friday, 21 December 2018

उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू

पिंपळे सौदागर : येथील साई चौकात असलेली उच्च दाबाच्या (हायटेंन्शन) विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भाजपच्या नगरसेविका निर्मला कुटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला चालना मिळाली आहे. पिंपळे सौदागर येथील साई चौक येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या पूलाच्या शेजारीच उच्चदाबाची विद्युत वाहिनी असल्यामुळे त्याचा मोठा अडथळा निर्माण होत होता. भविष्यात निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी नगरसेविका निर्मला कुटे यांनी तातडीने या वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरु करण्याच्या सुचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या. यावेळी विद्युत विभागाचे अधिकारी कावळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment