Pages

▼

Saturday, 12 January 2019

दीड वर्षांत पिंपरी चिंचवड शहरात सर्वांधिक कामे : मुख्यमंत्री फडणवीस

पिंपरी चिंचवड शहरातील मागील सत्ताधार्‍यांनी जितके काम केले नाही, त्यापेक्षा अधिक काम दीड वर्षांच्या कालावधीत केले आहे. फेब्रुवारीत आणखी 1 हजार कोटींच्या कामाचे उद्घाटन आहेत. भाजपच्या हातात सत्ता आल्यानंतर काय करू शकतो,  हे आम्ही दाखवून दिले आहे. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, पाच वर्षांच्या कालावधीतील बदल नागरिकांना दिसेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजना, ‘अर्बन स्ट्रीट डिजाईन’अंतर्गत 5 रस्त्यांचे सुशोभिकरण आणि स्मार्ट सिटी अंतर्गत फायबर केबल नेटवर्किंगच्या कामाचे ई-भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment