Pages

Thursday, 3 January 2019

दोन हजार रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत

सांगवी : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्यावतीने शिवार चौक आणि खेळाचे मैदान याठिकाणी विविध जातीच्या सुमारे दोन हजार रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, पी.के.स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, शंकर चोंधे, राजेंद्र जयस्वाल, विनोद भल्ला, विकास काटे, सुनीता बच्चे, मोहिनी मेटे, सुवर्णा काटे, कांचन काटे, मीनाक्षी राजू देवतारे, प्रकाशनगरकर, संभाजी कुंजीर, अशोक काटे, सतीश काटे, संजय डांगे, सागर बिरारी, आनंद योगा हास्यक्लब, नवचैतन्य हास्यपरिवार यांच्यासह विविध सोसायटीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment