Pages

Saturday, 9 February 2019

विरोधकांचा सोमवारी महापालिकेला गाजरांसह घेराव

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोडबाबत प्रश्‍नांकडे सत्ताधारी भाजपचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांकडून येत्या सोमवारी (दि. 11) महापालिका मुख्यालयाला मानवी साखळीतून गाजरांसह घेराव घालणार आहेत. दुपारी तीन वाजता हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment