Pages

Thursday, 7 March 2019

महापालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार अदिती निकम यांना जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार नवी सांगवीतील सामाजिक कार्यकर्त्या अदिती निकम यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. या पुरस्काराचे वितरण जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी होणार आहे. याबाबतची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment