Pages

Thursday, 7 March 2019

स्थायी सभापती निवडणुक : भाजपचे विलास मडेगिरी विजयी, शिवसेनेनं ‘युती धर्म’ पाळला

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले शीतल शिंदे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. सत्ताधारी भाजपकडून विलास मडेगिरी यांनाच मतदान करण्याचा व्हिप देखील सदस्यांना बजावण्यात आला होता. आज झालेल्या निवडणुकीत भाजपाचे विलास मडेगिरी विजयी झालेत. त्यांना शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी युतीचा धर्म पाळत मडेगिरींना मतदान केले. मडेगिरी यांना १६ पैकी १२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या मयुर कलाटे यांना ४ मतांवर समाधान मानावे लागले.

No comments:

Post a Comment