Pages

Tuesday, 21 April 2020

महाराष्ट्रात ७५ हजार रॅपिड टेस्ट करणार- राजेश टोपे

मुंबई | महाराष्ट्रात करोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या करोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही टोपे यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment