Pages

Monday, 6 April 2020

पुणे परिसरात १० टक्के विजेच्या मागणीत घट; पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम

पुणे - लॉकडाऊनमुळे राज्यातील विजेची मागणी निम्म्याने घटली आहे. त्यातच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे त्यामध्ये आणखी दहा टक्‍क्‍यांनी घट झाली. परिणामी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास गेल्या अनेक वर्षातील सर्वांत कमी म्हणजे 10 ते 11 हजार मेगावॅट एवढा वीजपुरवठा झाला. तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून सुमारे 600 ते 700 मेगावॅटपर्यंत विजेचा पुरवठा झाला.

No comments:

Post a Comment