Pages

Monday, 6 April 2020

IRDAI नं घेतला निर्णय ! कोट्यवधी जीवन विमा पॉलिसीधारकांना मोठा ‘दिलासा’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Irdai) जीवन विमा पॉलिसीधारकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जीवन विमा पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अधिक कालावधी दिला आहे. कोरोना विषाणू साथीमुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नियामकाने हे पाऊल उचलले आहे. ज्या जीवन विमा पॉलिसीधारकांची नूतनीकरण तारीख मार्च आणि एप्रिलमध्ये येते त्यांना प्रीमियम भरण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आयआरडीएने अगोदरच आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण प्रीमियम आणि थर्ड पार्टी मोटर विमा भरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे.

No comments:

Post a Comment