Pages

Sunday, 10 May 2020

दिलासादायक की “करोना’ला आमंत्रण?

पिंपरी – केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत पिंपरी-चिंचवड शहरातील लक्षणे नसलेल्या मात्र करोना बाधित असलेल्या तब्बल 34 रुग्णांना एकाच दिवशी (रविवारी) घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेचा हा निर्णय दिलासादायक ठरणार की करोनाला आमंत्रण देणारा हे काही दिवसांतच कळून येईल. मात्र करोनामुक्तीचे अहवाल न घेताच या रुग्णांना सोडण्यात आल्यामुळे केंद्राच्या अध्यादेशाचा दुष्परिणामच अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment