Pages

Wednesday, 6 May 2020

दत्ताकाकांच्या रुपाने चिखलीत अवतरला अन्नदाता, प्रभागातील हजारो नागरिकांची घेतली जबाबदारी

लॉकडाउनमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना धान्य वाटप केले जात आहे. मागील 15 दिवसांपासून रेशनकार्ड नसलेल्या चिखली परिसरातील नागरिकांना दररोज गहू आणि तांदळाचे वाटप केले जात आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी 700 पोती गहू आणि तांदूळ विकत आणल्याचे दत्ताकाकांनी सांगितले. एकही नागरिक भुकेला राहू नये, यासाठी यापुढेही धान्य वाटप सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment