Pages

Saturday, 15 April 2017

निगडीत तडीपाराला अटक

पिंपरी, (प्रतिनिधी) – तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका सराईताला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
अस्लम बशीर मुजावर (वय-21, रा. साने कॉलनी, मोरे वस्ती) याला साने चौकातून अटक केली. मुजावर याला तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तो त्या आदेशाचा भंग करून निगडी, साने चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक कोयता मिळून आला आहे. त्याच्या विरोधात आदेशाचा भंग करणे, तसेच घातक हत्यारे वापरणे याबबात गुन्हा दाखल केला आहे. तो कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले आणि शंकर आवताडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment