Pages

Wednesday, 21 June 2017

…तर “आवास’ योजनाच नको!

  • शहानिशा करा ः विरोधकांनी सभागृहात मांडल्या सूचना
पिंपरी,  (प्रतिनिधी) – “जेएनएनयुआरएम’ योजनेंतर्गत राबविलेले गृहप्रकल्प अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे रखडले आहेत. याची पुनर्रावृत्ती होऊन प्रधानमंत्री आवास योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न होणार असेल, तर ही योजना राबवूच नका. कारण, “जेएनएनयुआरएम’ योजनेंतर्गत घरांसाठी अर्ज केलेल्या साडेपाच हजार नागरिकांना घरे मिळालेली नाहीत. पुन्हा आवास योजनेद्वारे घरांचे स्वप्न दाखवून नागरिकांची फसवणूक होणार असेल, तर ही योजना कामाची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मांडली. तसेच, आवास योजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांतील संभाव्य त्रूटी अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आहेत.

No comments:

Post a Comment