Pages

Wednesday, 6 December 2017

पंतप्रधान आवासचे 36 हजार अर्ज पूर्ण भरलेले; 18 हजार अपूर्ण

पिंपरी- पंतप्रधान आवास योजनेसाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने मागविण्यात आलेल्या अर्जांची छाननी सुरु करण्यात आली आहे. 36 हजार अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह पूर्ण भरलेले असून 18 हजार अर्ज अपूर्ण आहेत. पात्र अर्जदारांची यादी पंतप्रधान आवास योजनेच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जाणार आहे. उर्वरित अर्जाची छाननी सुरु आहे. पालिकेकडे एकूण एक लाख तीन हजार अर्ज आले होते.

No comments:

Post a Comment