Pages

Thursday, 11 January 2018

शॉर्टसर्कीटमुळे आकुर्डीत चार दुकाने जळून खाक

पिंपरी, (प्रतिनिधी) – आकुर्डी येथील पीसीपी महाविद्यालयाजवळील सुयोग बुक डेपोला सोमवारी (दि.8) मध्यरात्री बाराच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये सुयोग बुक डेपोच्या दुकानाचे चारही दुकाने जळून खाक झाले.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पिंपरी व निगडी प्राधिकरण येथील अग्निशामक दलाच्यादोन गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत ही चारही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली होती.

No comments:

Post a Comment